समर्पित शिक्षकाचा सन्मान; सुजित भोजने यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : तालुक्यातील देवळी गावचे सुपुत्र आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुजित तुकाराम भोजने यांना यावर्षीचा “रायगड रत्न आदर्श शिक्षक” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. दैनिक महासागर वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्
Dedicated-teacher-honored-Suj


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : तालुक्यातील देवळी गावचे सुपुत्र आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुजित तुकाराम भोजने यांना यावर्षीचा “रायगड रत्न आदर्श शिक्षक” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. दैनिक महासागर वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्यात आलेला हा मानाचा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची पोचपावती मानला जात आहे.

सुजित भोजने हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पारंपरिक शिक्षणपद्धतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी यासाठी त्यांनी डिजिटल शिक्षण पद्धतीचा प्रभावी वापर केला आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि विशेष वर्गांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस त्यांनी मोठा हातभार लावला आहे. त्यांच्या या समर्पित कार्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांमध्ये त्यांना विशेष मानाचे स्थान मिळाले आहे.

या सन्मानामुळे देवळी गावासह संपूर्ण माणगाव तालुक्याचा गौरव वाढला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांनी शिक्षण क्षेत्रात असेच प्रेरणादायी कार्य करत राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande