पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याची दुरुस्ती रखडली
पुणे, 22 एप्रिल, (हिं.स.)। पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील साडेसहा हजार कोटी रुपये खर्चाचा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याची जय्यत तयारी करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) याच रस्त्यावरील आडोशी बोगद्याच्या
express


पुणे, 22 एप्रिल, (हिं.स.)। पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील साडेसहा हजार कोटी रुपये खर्चाचा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याची जय्यत तयारी करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) याच रस्त्यावरील आडोशी बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मात्र तितकासा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. या बोगद्याचे खडकाळ छत कोसळून महिना लोटला असला तरी त्याची दुरुस्ती अद्याप सुरूच झालेली नाही.

पवई येथील आयआयटीतील तज्ज्ञांकडून त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाबाबतचे मार्गदर्शन मिळाल्यानंतरच हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अधिकारी राकेश सोनवणे यांनी सांगितले. ‘आयआयटी’तील तज्ज्ञांनी सुमारे तीन आठवड्यांपूर्वी बोगद्याचे सर्वेक्षण करून आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याआधारेच ते आपला अहवाल देणार आहेत, असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande