आरटीई प्रवेशासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ पालकांना दिलासा, आतापर्यंत १२३७ प्रवेश निश्चित
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेसाठी १० दिवसांची म्हणजे ३१ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. सद्यःस
आरटीई प्रवेशासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ पालकांना दिलासा, आतापर्यंत १२३७ प्रवेश निश्चित


अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.)

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेसाठी १० दिवसांची म्हणजे ३१ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २ हजार ६२६ जागांसाठी केवळ १ हजार २३७ प्रवेश निश्चित झाले आहे.

जिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी तब्बल ७ हजार ९६० बालकांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. २२७ इंग्रजी शाळेमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश स्वीकारले जाणार आहे. याकरिता पुणे येथे ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यामध्ये २६२६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तितकेच विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. या विद्यार्थ्यांची यादी १० एप्रिलला प्रसिद्ध करून प्रत्यक्ष प्रवेशाला सुरूवात करण्यात आली होती. कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल होती. मात्र आता ही मुदत वाढवून २१ ते ३० एप्रिल २०२६ अशी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत किंवा प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा पालकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यासंदर्भात आरटीई प्रवेश पोर्टलवरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२३७ प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवेश होण्याच्या उद्देशान शासनाकडू न या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande