नांदेड - माहूरमधील आनंद आश्रमात अधिक मासानिमित्त अन्नदान व दत्त नामस्मरण सोहळा
नांदेड, 22 एप्रिल (हिं.स.)। संताच्या भूमीत जन्मलेले महाराष्ट्रात स्वच्छता ब्रँड अँबेसिडर ग्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर उर्फ वसमतकर यांच्या श्रीक्षेत्र माहुर गडावरील आश्रमात अधिक मास (धोंड्याचा महिना) पुरुषोत्तम मासानिमित्त १७ मे ते १५ जून
नांदेड - माहूरमधील आनंद आश्रमात अधिक मासानिमित्त अन्नदान व दत्त नामस्मरण सोहळा


नांदेड, 22 एप्रिल (हिं.स.)। संताच्या भूमीत जन्मलेले महाराष्ट्रात स्वच्छता ब्रँड अँबेसिडर ग्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर उर्फ वसमतकर यांच्या श्रीक्षेत्र माहुर गडावरील आश्रमात अधिक मास (धोंड्याचा महिना) पुरुषोत्तम मासानिमित्त १७ मे ते १५ जून या कालावधीत अन्नदान व दत्त नामस्मरण सोहळा होणार आहे.

गोरठयातील संत दासगणू महाराज यांच्याकडे सद्गुरु साईनाथ महाराज यांचे वडिल वास्तव्यास होते. याच पावन भूमीत बितनाळ येथे साईनाथ महाराज संत म्हणून उदयास आले. श्रीक्षेत्र माहूर गड येथे त्यांचा आनंद आश्रम आहे. या आश्रमात विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात. महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून साईनाथ महाराज यांची निवड झाली आहे. शासकीय आयटीआयचे प्रमुख मार्गदर्शक श्री साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आध्यात्मिक, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम पार पडणार आहेत. श्री साईनाथ महाराज वसमतकर हे समाजप्रबोधन, स्वच्छता, अन्नदान व अध्यात्म क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या दशसूत्री कार्यक्रमातून राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये नित्य अन्नदान, शिवनेरी किल्ल्यावर दत्त नामस्मरण, अटारी बॉर्डर येथे दत्त नामाचा गजर, तसेच गिरनार पर्वतावर सात दिवसांचा सप्ताह व नामस्मरण यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजीविरोधी जनजागृती, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातही ते सातत्याने कार्यरत आहेत. अधिक मासानिमित्त माहूर तालुक्यातील भाविक, नागरिकांना चुलबंद आमंत्रण उमरीवासीयांना दिले आहे.

दि. १७ मे रोजी अन्नदानाची पहिली पंगत होणार आहे. ही सेवा उमरी तालुक्यातील सुभाष देशमुख गोरठेकर (नाना), उमरी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, उमरीचे उपनराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, समस्त गोरठेकर परिवार आणि गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात येणार आहे. अखंड अन्नदान महायज्ञाचा समारोप १५ जून रोजी श्री साईनाथ महाराज वसमतकर यांचे जन्मगाव बितनाळ येथील भाविकांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कालावधीत दररोज दत्त नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान तसेच समाजप्रबोधनपर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

---

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande