नांदेडमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीवर कारवाई
, 22 एप्रिल (हिं.स.)। प्रतिबंधित गुटखा विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल १ लाख ७३ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच
नांदेडमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीवर कारवाई


, 22 एप्रिल (हिं.स.)।

प्रतिबंधित गुटखा विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल १ लाख ७३ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने देगलूर शहरातील देशपांडे गल्ली, जामा मस्जिद समोरील आनंद अनिलराव काशेटवार (३७) याच्या राहत्या घरावर छापा टाकला. मुद्देमालासह आरोपीस अटक करण्यात आली. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण १ लाख ७३, हजार ९०८ रुपयांचा साठा

आढळून आला. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरनं १९६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि. हनमंत शिंदे करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande