आष्टा येथे 'शासन आपल्या दारी' समाधान उपक्रम
लातूर, 22 एप्रिल (हिं.स.)। चाकूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबीर अभियान टप्पा क्रमांक १ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चाकूर तालुक्यातील आष्टा येथे ''शासन आपल्या दारी'' हा समाधान उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी
शासन आपल्या दारी


लातूर, 22 एप्रिल (हिं.स.)।

चाकूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबीर अभियान टप्पा क्रमांक १ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चाकूर तालुक्यातील आष्टा येथे 'शासन आपल्या दारी' हा समाधान उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे तसेच चाकूरचे तहसिलदार नरसिंग जाधव हे उपस्थित होते.

आष्टा येथील आयोजित समाधान नागरिकानी प्रतिसाद दिला. विविध योजनांची माहिती, योजनांचा लाभ व मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरणांसह नागरिकांना १५ प्रकारच्या महसुली सेवा देण्याचे उद्दीष्ट चाकूर तहसीलच्या वतीने ठेवण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे यांच्या हस्ते समाधान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी तहसिलदार नरसिंग जाधव,

जि. प. सदस्य भानुदास पोटे, प.स. उपसभापती भूजंग शिंदे, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार शैलेश निकम, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी विद्या लोमटे, सरपंच सावता माळी, माजी सरपंच श्रीमंत शेळके, पोलीस पाटील सूर्यकांत पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्य व सोसायटी सदस्य उपस्थित होते.

शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. डिजिटल सातबारा वितरण, उत्पनांची प्रमामपत्रे, रहिवासी प्रमाणपत्रे, शिधापत्रिका दुरुस्ती, आधार कार्ड अद्ययावत करणे, पीएम किसान नोंदणी, ई-मोजणी,

फेरफार प्रकरणे, अकृषिक परवानगी, सामाजिक योजनांचे मंजुरीपत्र वाटप, आरोग्य तपासणी आदी योजनांची माहिती व योजनांचा लाभ यावेळी देण्यात आला. प्रमाणपत्रांचे वाटप उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे, तहसिलदार नरसिंग जाधव, गट विकास अधिकारी संतोष वंगवाडे आदींनी केले. महिलांना बेबी केअर किटचेही वितरण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे यांनी नागरिकांनी तालुका किंवा जिल्हा पातळीवर धाव घेण्याऐवजी अशा समाधान शिबिरांच्या माध्यमातून गावातच आपली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन केले. तहसिलदार नरसिंग जाधव यांनी पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत शासनाने घेतलेल्या कठोर निर्णयाची

माहिती दिली. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले. शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामामध्ये आपल्या शेतातील पिकांची नोंद आपल्या सात बारावर ई पिक पाहणी अॅपद्वारे नोंद करून घेण्याचेही आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande