सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन
मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) - सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२.५५ हेक्टर आर.जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र
सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन


मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) -

सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२.५५ हेक्टर आर.जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही जमीन एमआयडीसीला शेत जमिनीच्या दराने देण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यासह परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळावी यासाठी मौजे नागेवाडी (ता.सातारा) येथे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास मौजे नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ मधील ४२.५५ हे.आर. इतकी शासकीय जमीन देण्यात येणार आहे. ही जमीन सध्याच्या शेत जमिनीच्या बाजारभावाने एमआयडीसीला खरेदी करावी लागणार आहे. ही जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून एमआयडीसीला मिळणार आहे. या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्यांना प्रकल्प उभा करता येणार असल्याने या परिसरातील अभियांत्रिकी तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना स्थानिकरित्या व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande