कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभ; ऑनलाईन प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना दिलासा
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली असून, यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा कौशल्य
अण्णा


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली असून, यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी याबाबत माहिती दिली.

नवीन प्रणालीअंतर्गत अपूर्ण कागदपत्रांमुळे ‘अपूर्ण कागदपत्रांमुळे नाकारा’ स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर पाहता येणार आहेत. यामुळे आवश्यक कागदपत्रे स्वतः ऑनलाईन अपलोड करून प्रकरणे पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कार्यालयीन फेऱ्यांची गरज कमी होणार आहे. कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण 'छाननी’ स्तरावर जाईल व त्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यावर सबमिट पर्याय उपलब्ध होईल. तसेच, व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करताना 'होल्ड'‘ स्थितीत असलेल्या प्रकरणांची कारणेही लाभार्थ्यांना लॉगिनवर स्पष्टपणे दिसतील. अशा प्रकरणांतील त्रुटी १५ दिवसांच्या आत पूर्ण करून जिल्हा समन्वयकांमार्फत पुढील कार्यवाही केली जाईल. प्राथमिक तपासणीनंतर प्रकरण विभागीय समन्वयकांकडून मुख्यालयाकडे पाठवले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande