मांडवा येथे १५०० कोटींचा मरिना प्रकल्प; पर्यटनाला नवी चालना
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे लवकरच अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्यात येणार असून या माध्यमातून परिसराला मिनी टुरिस्ट हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक
Marina project of Rs 1500 crores in Mandwa; new boost to tourism


Marina project of Rs 1500 crores in Mandwa; new boost to tourism


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे लवकरच अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्यात येणार असून या माध्यमातून परिसराला मिनी टुरिस्ट हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मांडवा येथील मरिना प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाढते पर्यटन आणि मांडवा जेटीवरील प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेता अत्याधुनिक सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सध्या जेटीवर बोटी उभ्या करण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याने भरती-ओहोटीच्या काळात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर मरिना प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी मांडवा येथे मरिना उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मंत्री राणे यांनी प्रकल्पाला गती देत येत्या ८ ते १५ दिवसांत आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या प्रकल्पामुळे छोट्या प्रवासी बोटी, यॉट्स आणि लहान जहाजांसाठी सुरक्षित बंदर उपलब्ध होणार आहे. परिणामी पर्यटनवाढ, रोजगारनिर्मिती, व्यापार वृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विकास होऊन मांडवा बंदराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अलिबाग-मुरुड परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मांडवा मरिना प्रकल्प हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande