कश्मीरमध्ये शिवसेनेचा प्रसार व प्रचार अत्यंत प्रभावीपणे होत आहे - संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कश्मीर संभाग शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप
Q


छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कश्मीर संभाग शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या व आत्मीयतेने केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

कश्मीरमध्ये शिवसेनेचा प्रसार व प्रचार अत्यंत प्रभावीपणे होत असून, संघटन बळकट करण्यासाठी त्यांचे नेतृत्व उल्लेखनीय आहे, हे प्रत्यक्ष पाहून आनंद वाटला. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून तो एक विचार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा, आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा हा वारसा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. आजवर शिवसेना नेहमीच जनतेच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभी राहिली आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा मिळाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande