पालकमंत्री संजय शिरसाट यांची पहलगाम येथील बैसरन शहीद स्मारकाला भेट
छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल (हिं.स.)। पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळ्या दिवशी दहशतवाद्यांनी निर्दोष भारतीय नागरिकांवर अमानुष हल्ला करून २६ निरपराध बांधवांचे प्राण घेतले. हा हल्ला
Q


छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल (हिं.स.)। पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळ्या दिवशी दहशतवाद्यांनी निर्दोष भारतीय नागरिकांवर अमानुष हल्ला करून २६ निरपराध बांधवांचे प्राण घेतले. हा हल्ला केवळ व्यक्तींवर नव्हता, तर भारताच्या एकतेवर, शांततेवर आणि मानवतेवर केलेला आघात होता.

आज या घटनेच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पहलगाम येथील बैसरन शहीद स्मारकावर भेट देऊन शहीद झालेल्या २६ वीर भारतीय बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होत, त्यांच्या बलिदानाला कृतज्ञतेने स्मरलं.या प्रसंगी शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्व सहभागी आहोत, ही भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या बलिदानामुळेच देश सुरक्षित आहे, याची जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव राहील.असे त्यांनी यावेळी सांगितले दहशतवादाला कधीही शरण जाणार नाही, तर एकजूट होऊन त्याला ठाम उत्तर देणार — हा निर्धार आज पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही...भारत माता त्यांच्या या त्यागाला सदैव स्मरणात ठेवेल. असे त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande