नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणावर संताप; अभाविपकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार निषेध
सखोल चौकशी व कठोर कारवाईची ठाम मागणी नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरच्या वतीने टिसीएस कंपनीच्या नासिक प्रकल्प येथे घडल्याचा आरोप असलेल्या महिलांशी संबंधित गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय
Outrage erupts in Nashik over


सखोल चौकशी व कठोर कारवाईची ठाम मागणी

नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)।

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरच्या वतीने टिसीएस कंपनीच्या नासिक प्रकल्प येथे घडल्याचा आरोप असलेल्या महिलांशी संबंधित गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महिला कर्मचाऱ्यांवरील कथित लैंगिक छळ, मानसिक त्रास तसेच दबावाच्या प्रकारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अभाविप कडून प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, या घटनेमुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

प्रमुख मागण्या

प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी

दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी.

पीडित महिलांना कायदेशीर व मानसिक मदत उपलब्ध करून द्यावी.

कंपनीतील Internal Complaints Committee प्रभावीपणे कार्यरत ठेवावी.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. “महिलांना कॉर्पोरेट क्षेत्रात सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे” हा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला. अशा घटनांमुळे महिलांच्या कामकाजावर परिणाम होतो, असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

नाशिकसारख्या शहरात नामांकित कंपनीमध्ये जर एखाद्या मुलीची फसवणूक, भावनांशी खेळ, मानसिक छळ आणि जबरदस्ती धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्याचे प्रकार घडत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. विश्वासाने सुरुवात करून खोटी ओळख, भावनिक जाळं आणि नंतर दबाव, धमक्या, ब्लॅकमेल — हे कोणतंही प्रेम नाही, ही सरळ फसवणूक, शोषण आणि विश्वासघात आहे. दिवसांपूर्वी PVG कॉलेजमधील लव जिहाद प्रकार पुन्हा समोर आला आहे. ही लढाई एका मुलीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या भविष्यासाठी आहे.असे प्रतिपादन मेघा शिरगावे अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री यांनी केले. यावेळी महानगर मंत्री व्यंकटेश अवसरकर सहमंत्री योगेश महाजन सार्थक आढाव देवेंद्र देशमुख मृणाल देव अक्षदा कालेकर क्षितिजा बुराडे प्रांजल ढोकणे आदिती आढाव विजया नरवाडे शताक्षी नागरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande