पद्मश्री सन्मानानंतर डॉ. शंकरबाबा पापळकर यांचा चिखलदरा दौरा
शिक्षण व विकास विषयांवर दिला भर अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी चिखलदरा नगरपालिकेला भेट देत येथील शैक्षणिक व्यवस्था आणि स्थानिक समस्यांचा सखोल आढावा घेतला. त्यांच्या या दौऱ्यामुळे परिस
पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची चिखलदरा पालिकेला भेट नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा


शिक्षण व विकास विषयांवर दिला भर

अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी चिखलदरा नगरपालिकेला भेट देत येथील शैक्षणिक व्यवस्था आणि स्थानिक समस्यांचा सखोल आढावा घेतला. त्यांच्या या दौऱ्यामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी नगराध्यक्ष शेख अब्दुल यांनी राबविलेल्या विविध विकासकामांची डॉ. पापळकर यांनी प्रशंसा केली. त्यांनी शेख अब्दुल यांना “खऱ्या समाजसेवेचे उदाहरण” असे संबोधत त्यांच्या कार्याची दखल घेतली.

दौऱ्यात डॉ. पापळकर यांनी विशेषतः शिक्षण क्षेत्रातील अडचणींची गांभीर्याने नोंद घेतली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांनी स्वतः पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली. तसेच शिक्षणक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रसंगी चिखलदरा नगरपालिका तर्फे नगराध्यक्ष शेख अब्दुल यांच्या हस्ते डॉ. पापळकर यांचा सत्कार करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच सार्वजनिक सत्कार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रमोद नाईक, नगरसेवक रूपेश चौबे, शेख जाहीर, आशू शेख तसेच ज्येष्ठ नागरिक गम्मू गुरुजी, भास्कर हरमकार, शेख जमील आदी मान्यवर उपस्थित होते

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande