'रोसा 'ची सोलापूर जिल्ह्याची नविन कार्यकारिणी जाहीर
सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशन (ROSA) आयोजित फॅमिली गेट-टुगेदर व नविन कार्यकाकारिणी सोहळा सोलापूर येथील निसर्ग हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी एकोप्याची भावना आणि संघटनबळ दृढ करण्याचा संदेश द
trdf


सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशन (ROSA) आयोजित फॅमिली गेट-टुगेदर व नविन कार्यकाकारिणी सोहळा सोलापूर येथील निसर्ग हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी एकोप्याची भावना आणि संघटनबळ दृढ करण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी समाजातील ऐक्य आणि संघटित शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत रोसा च्या कार्याचा गौरव केला.या सोहळ्यास सोलापूर महानगरपालिकेतील चर्मकार समाजाच्या विद्यमान नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संगिता जाधव व चाबुकस्वार यांचे सह विशेष उपस्थिती लाभली. सर्व नविन निवडून आलेल्या नगरसेविकांचा सत्कार रोसा व्हे प्रमुख श्रीडॉ.विठ्ठल दांडगे ह्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी रोसा चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव दांडगे, श्री सुरेश पाखरे मुख्य अभियंता मेट्रो ठाणे,डॉ. विश्वनाथ शिंदे धुळे तसेच सोलापूर कार्यकारिणीचे नवनियुक्त अध्यक्ष संजय धनशेट्टी यांनी संघटनेची कार्यपद्धती उद्दिष्टे आणि भविष्यातील वाटचाल यावर सखोल मार्गदर्शन केले. समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रभावी आणि रंगतदार सूत्रसंचालन लोकशाहीर रमेश खाडे यांनी केले.याच वेळी रोसा सोलापूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, आगामी काळात संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सदस्यांनी संघटनेच्या विस्तारासाठी, समाजातील प्रश्नांवर एकजुटीने लढा देण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.संपूर्ण कार्यक्रमात कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव दृढ करणारा हा उपक्रम ठरला , पदाधिकारी खालिल प्रमाणे मुख्य मार्गदर्शक डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande