डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरण; दोषमुक्तीचा अर्ज न्यायलयाने फेटाळला
सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी हा अर्ज फेटाळून लावला. 18 एप्रि
डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरण; दोषमुक्तीचा अर्ज न्यायलयाने फेटाळला


सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी हा अर्ज फेटाळून लावला. 18 एप्रिल 2025 रोजी डॉ. वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या मनीषा माने-मुसळे विरोधात गुन्हा नोंद केला होता. मागील वर्षभरापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या गुन्ह्यात आपला संबंध नसल्याचे म्हणत यातून दोषमुक्ती व्हावी यासाठी आरोपी मनीषा माने-मुसळे हिने सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आरोपीला दोषमुक्त करण्यास नकार देत अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आरोपी मनिषा माने-मुसळे हिचे वकील ऍड. प्रशांत नवगिरे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande