बीड - तालुका माहेश्वरी सभेची आगामी तीन वर्षांसाठीची नूतन कार्यकारिणी बिनविरोध
बीड, 22 एप्रिल, (हिं.स.)। तालुका माहेश्वरी सभेची आगामी तीन वर्षांसाठीची (२०२६-२०२९) नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी पुरुषोत्तम रांदड व सचिवपदी ईश्वर लोहिया यांची सर्वानुमते निवड झाली. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, बी
बीड - तालुका माहेश्वरी सभेची आगामी तीन वर्षांसाठीची नूतन कार्यकारिणी बिनविरोध


बीड, 22 एप्रिल, (हिं.स.)। तालुका माहेश्वरी सभेची आगामी तीन वर्षांसाठीची (२०२६-२०२९) नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी पुरुषोत्तम रांदड व सचिवपदी ईश्वर लोहिया यांची सर्वानुमते निवड झाली.

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तोष्णीवाल आणि जिल्हा सचिव जगदीश जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. नूतन कार्यकारिणीत जगदीश रामप्रसाद जाजू, प्रवीण बजाज (उपाध्यक्ष), रामानुज मुंदडा (कोषाध्यक्ष), पवन तापडीया व संतोष सारडा-घाटनांदूर (सहसचिव), मुन्ना सोमाणी (संघटनमंत्री) आणि संजय रामविलास लोहिया (प्रसार मंत्री) यांची निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया ललित बजाज व संतोष भंडारी यांनी राबविली. यावेळी मावळत्या कार्यकारिणीने नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित तोष्णीवाल, माजी तालुकाध्यक्ष दत्तप्रसाद लोहिया, सतीष तोष्णीवाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande