पालघरहून रायगडला बदली; डॉ. सातपुते यांच्याकडे अतिरिक्त सीईओ पदाची धुरा
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून क
Transferred-from-Palghar-to-Ra


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यजित बडे यांची पुणे येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे या प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या.

डॉ. सातपुते यांनी पालघर जिल्ह्यात कार्यरत असताना कुपोषण नियंत्रण तसेच ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांत सक्रिय भूमिका बजावली आहे. तसेच कोकण सरस महोत्सवासारख्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनातही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे.

बुधवारी (दि. २२) त्यांनी रायगड जिल्हा परिषदेत प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे यांनी त्यांचे स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande