जळगाव - वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी 'फार्मर आयडी'  नोंदणी मोहीम सुरू
जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.) राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी सुरू असून, वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी Farmer ID नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वनहक
जळगाव - वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी 'फार्मर आयडी'  नोंदणी मोहीम सुरू


जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.) राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी सुरू असून, वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी Farmer ID नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वनहक्क अधिनियम, २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी Farmer ID नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. वनहक्क अधिनियम, २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांची 'फार्मर आयडी' नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह 'फार्मर आयडी' नोंदणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 'फार्मर आयडी' नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande