मनमाड - प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू
मनमाड, 22 एप्रिल (हिं.स.)। इंडियन ऑइल कंपनीच्या गॅस प्रकल्पात वारसाना नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धोटाने गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पा जवळ आमरण उपोषण सुरु केले. आमरण उपोषण सुरु करून दोन दिवसाचा कालावधी उलटून देखील प्रक
मनमाड - प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू


मनमाड, 22 एप्रिल (हिं.स.)।

इंडियन ऑइल कंपनीच्या गॅस प्रकल्पात वारसाना नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धोटाने गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पा जवळ आमरण उपोषण सुरु केले. आमरण उपोषण सुरु करून दोन दिवसाचा कालावधी उलटून देखील प्रकल्प प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले.शहरा पासून 7 किमी अंतरावर असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या बॉटलिंग प्लांट जवळ साहेबराव कुणगर,आनंदा हासाळे,भगवान हासाळे आणि जयराम कुणगर या चार वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरु केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बॉटलिंग प्लांट सुरु करण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीने 1994 साली धोटाने परिसरातील 26 शेतकऱ्यांची शेत जमीन संपादित केली. जमीन घेताना तुमच्या वारसाना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. काहींना नोकरीं देण्यात आली आहे मात्र 22 वर्षाचा कालावधी उलटून देखील आमच्या वारसाना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. गेल्या 22 वर्षा पासून आम्ही कंपनी आणि सरकारकडे निवेदने देत आहोत अनेक वेळा आंदोलने देखील केली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आम्ही आमरण उपोषण करीत आहे जो पर्यत आमच्या वारसाना नोकरीत सामावून घेतले जात नाही आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande