नाशिक - दिव्यांग व्यक्तींसाठी विनामूल्य उपक्रम
जयपुर फुटसाठी नावनोंदणीचे आवाहन नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.) आचार्य सम्राट प.पू. आनंद ऋषीजी यांचा स्मृतीदिन उत्तर भारतीय प्रवर्तक प.पू. श्री आशीष मुनिजी म सा यांच्या जन्मदिनानिमित्त श्री नवकार आशीष सेवा ट्रस्ट, साधुवासवानी मिशन पुणे, नवकार ग्रुप, जैन
नाशिक - दिव्यांग व्यक्तींसाठी विनामूल्य उपक्रम


जयपुर फुटसाठी नावनोंदणीचे आवाहन

नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.) आचार्य सम्राट प.पू. आनंद ऋषीजी यांचा स्मृतीदिन उत्तर भारतीय प्रवर्तक प.पू. श्री आशीष मुनिजी म सा यांच्या जन्मदिनानिमित्त श्री नवकार आशीष सेवा ट्रस्ट, साधुवासवानी मिशन पुणे, नवकार ग्रुप, जैन युवक मंडळ, मारवाड़ी युवा मंच मिडटाऊन व नासिक शाखा,भारतीय जैन संघटना नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना विनामूल्य कृत्रीम अवयव (हात, पाय) बसविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अवयव तयार झाल्यावर महिनाभरात ते बसवून देण्यात येतील व सराव करुन घेण्यात येईल.

या शिबीराला वेळ असला तरी अंतर्गत कृत्रीम अवयव बसविण्यासाठी गरजुंनी आधी दि.२६ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. दि.३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत दिंडोरी रोडवर आनंदऋषी मार्ग, सौभाग्यनगर येथील जैन स्थानकासमोर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात तज्ज्ञांकडून प्रत्यक्षात माप घेतले जाणार आहे. कृत्रिम अवयव बसविल्यावर दिव्यांग व्यक्ती दैनंदिन कामे सहजतेने करु शकेल. व्यवस्थित बसता, चालता येते. जिने, चढायला आधार लागत नाही. सायकल चालवणे शक्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमत्त्व विकास होतो.

यापूर्वी अशा अनेक यशस्वी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा लाभ अनेक दिव्यांग व्यक्तींनी घेतला. आज ते सर्वजण आपापल्या पायांवर ताठ उभे राहिले आहेत. कृत्रिम हात बसविण्यात आलेले स्वावलंबी झाले आहेत. यावेळी हे शिबीर सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. जास्तीत जास्त गरजुंनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी नीलेश भंडारी ९८५०९०५७६७, विनोद कांकरिया ९८५००५५८८६, संदीप गांग ९८२३१७८७८९, महेश अलिझाड ९४२०९०३६९७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande