
नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.)। सोमवार म्हणजेच 27 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या व्यापार सप्ताहात प्रायमरी मार्केट मोठ्या प्रमाणात शांत राहणार आहे. मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही फक्त एकच कंपनी आपला आयपीओ लाँच करत आहे. हा आयपीओ एसएमई सेगमेंटचा आहे. या नव्या आयपीओव्यतिरिक्त मागील आठवड्यात उघडलेल्या एका आयपीओमध्येही या आठवड्यात गुंतवणूकदार बोली लावू शकतील. हा आयपीओही एसएमई सेगमेंटचाच आहे. लिस्टिंगबाबत बोलायचे झाल्यास या आठवड्यात दोन कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करणार आहेत. यापैकी एक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची लिस्टिंग असणार आहे.
या आठवड्यात उघडणारा एकमेव आयपीओ अंबा ऑटो सेल्स अँड सर्व्हिसेसचा आहे. कंपनीचा 65.12 कोटी रुपयांचा आयपीओ आठवड्याच्या पहिल्याच कारोबारी दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी सब्सक्रिप्शनसाठी उघडला जाईल. या इश्यूमध्ये 29 एप्रिलपर्यंत बोली लावता येईल. आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी 130 रुपये ते 135 रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज 1,000 शेअर्सचा आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर 30 एप्रिल रोजी अलॉटमेंट अंतिम केले जाईल, तर 5 मे रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग होऊ शकते.
या नव्या आयपीओ व्यतिरिक्त मागील आठवड्यात 23 एप्रिल रोजी सब्सक्रिप्शनसाठी उघडलेल्या आदीसॉफ्ट टेक्नोलॉजीजच्या 74.10 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये सोमवार म्हणजे 27 एप्रिलपर्यंत बोली लावता येईल. या आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी 163 रुपये ते 172 रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. इश्यू बंद झाल्यानंतर 28 एप्रिल रोजी शेअर्सचे अलॉटमेंट होऊ शकते, तर 30 एप्रिल रोजी कंपनीचे शेअर्स एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होऊ शकतात. आतापर्यंत या पब्लिक इश्यूला 3.34 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे.
शेअर बाजारातील लिस्टिंगबाबत बोलायचे झाल्यास या आठवड्यात 29 एप्रिल रोजी बीएसई आणि एनएसईवर सिटियस ट्रान्सनेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची लिस्टिंग होऊ शकते. तसेच 30 एप्रिल रोजी आदीसॉफ्ट टेक्नोलॉजीजचे शेअर्स एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होऊ शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule