मुंबईतील रहेजा हॉस्पिटलची ४५ वर्षे पूर्ण; 'प्रगत डायग्नोस्टिक्स' आणि 'ऑर्थोरोबो केअर' सेवांचे उद्घाटन
प्रत्येक रुग्णाला त्यांच्या गरजेनुसार योग्य, विश्वासार्ह आणि अचूक उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्नशील मुंबई, २८ एप्रिल (हिं.स.) : एस.एल. रहेजा हॉस्पिटल (फोर्टिस असोसिएट) विश्वसनीय आरोग्य सेवेची आपली ४५ वर्षे पूर्ण करत आहे. या निमित्ताने, वैद्यकीय सेव
raheja


प्रत्येक रुग्णाला त्यांच्या गरजेनुसार योग्य, विश्वासार्ह आणि अचूक उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्नशील

मुंबई, २८ एप्रिल (हिं.स.) : एस.एल. रहेजा हॉस्पिटल (फोर्टिस असोसिएट) विश्वसनीय आरोग्य सेवेची आपली ४५ वर्षे पूर्ण करत आहे. या निमित्ताने, वैद्यकीय सेवेतील आपली बांधिलकी अधिक मजबूत करत हॉस्पिटलने दोन महत्त्वाच्या सुविधा सुरू केल्या आहेत: एक अत्याधुनिक 'हिस्टोपॅथॉलॉजी विभाग' आणि प्रगत 'रोबोटिक ऑर्थोपेडिक सर्जरी सिस्टम'. हॉस्पिटलमध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात माननीय विश्वस्त सुमन रहेजा आणि ज्योती रहेजा यांच्या उपस्थितीत या सेवांचे उद्घाटन करण्यात आले.

स्वर्गीय डॉ. अनिता बोर्जेस यांनी स्थापन केलेला 'हिस्टोपॅथॉलॉजी विभाग' आता अधिक अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सज्ज झाला आहे. हा विभाग म्हणजे अनेक वर्षांचा अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान यांचा एक उत्तम संगम आहे. याच्या उच्च दर्जामुळेच, भारत आणि परदेशातील मोठ्या कॅन्सर संस्थांनी या विभागाला 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चा दर्जा दिला आहे. २००३ पासून आतापर्यंत या विभागात २,२०,००० पेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आज येथे केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नाही, तर बांगलादेश आणि नेपाळसारख्या देशांतूनही क्लिष्ट कॅन्सरच्या (उदा. ब्रेस्ट, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सर) तपासणीसाठी नमुने येतात. आता नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अधिक अचूक, विश्वासार्ह आणि जलद रिपोर्ट मिळतील. ज्यामुळे डॉक्टरांना योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे सोपे होईल.

रुग्णांवरील उपचार अधिक चांगले करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आता एक 'ऑर्थोपेडिक रोबोट' उपलब्ध झाला आहे. हा रोबोट शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांसाठी एका 'स्मार्ट असिस्टंट'प्रमाणे काम करेल, ज्यामुळे उपचारातील अचूकता वाढेल आणि परिणाम अधिक चांगले मिळतील. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला हा 'Velys by Depuy' रोबोट, शस्त्रक्रियेवेळी 'इम्प्लांट' अगदी योग्य ठिकाणी बसवण्यास आणि शरीराच्या अवयवांचे अचूक अलाइनमेंट करण्यास मदत करतो. या आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा अशा रुग्णांना होईल ज्यांची गुडघा (UKR) किंवा खुब्याची (THR) रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया होणार आहे. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान शरीराला कमी इजा होते आणि रुग्ण अतिशय वेगाने बरे होऊन आपल्या पायावर उभे राहू शकतात.

या नवीन सुविधांबद्दल बोलताना एस. एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम - फोर्टिस असोसिएटचे सीईओ, डॉ कुणाल पुनामिया म्हणाले, आरोग्य सेवेतील आमच्या ४५ वर्षांच्या प्रवासात, या दोन नवीन सुविधा रुग्णांची काळजी घेण्याच्या आमच्या निर्धाराला अधिक मजबूत करतात. आता आजाराचे निदान करण्यापासून ते उपचारांपर्यंत सर्व काही अधिक चांगले होईल. प्रगत हिस्टोपॅथॉलॉजी विभागामुळे डॉक्टरांना अचूक निर्णय घेणे सोपे जाईल, तर रोबोटिक सिस्टीममुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होईल. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना उत्तम उपचार आणि चांगला अनुभव देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.

हा विभाग स्वर्गीय डॉ. अनिता बोर्जेस यांना समर्पित करताना, डॉ. प्रवीण महाजन (प्रमुख - हिस्टोपॅथॉलॉजी विभाग) म्हणाले, सुरुवातीपासूनच आमचा हा विभाग सर्वोत्तम सेवा देण्यासाठी ओळखला जातो. आमची विश्वासार्हता ही अचूकता, प्रामाणिकपणा आणि विश्वास या तीन गोष्टींवर आधारलेली आहे. गेल्या अनेक वर्षांत, देशभरातील डॉक्टरांनी अनेक कठीण केसेस आमच्याकडे सेकंड ओपिनियनसाठी पाठवल्या आहेत, जे आमच्या कामावरील त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. खरे तर, आमचा हा प्रवास नेहमीच रुग्णांसाठी राहिला आहे. आमच्यासाठी प्रत्येक तपासणी ही एक मोठी जबाबदारी आहे आणि प्रत्येक रिपोर्टमागे एका माणसाची गोष्ट जोडलेली असते.

ऑर्थोपेडिक रोबोटिक सिस्टमचे उदघाटन करण्यात आल्याबद्दल, डॉ. ललित पांचाल (सीनियर कन्सल्टंट – ऑर्थोपेडिक सर्जरी) म्हणाले, रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे होणारी शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी एका 'इंटेलिजेंट असिस्टंट'प्रमाणे काम करते. यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होते आणि त्याचे निकालही उत्तम मिळतात. या सिस्टममुळे शस्त्रक्रियेचे नियोजन करणे आणि ती पार पाडणे खूप सोपे होते. या तंत्रज्ञानामुळे शरीरावर कमीत कमी चीर-फाड होऊन सुरक्षित शस्त्रक्रिया करता येते, ज्यामुळे रुग्णाला नैसर्गिक रिझल्ट मिळतात आणि ते खूप लवकर बरे होतात.

या नवीन सुविधांचे उदघाटन ही केवळ एक सुरुवात नसून, आरोग्य सेवेप्रती असलेल्या आमच्या अढळ संकल्पाचा पुरावा आहे. वैद्यकीय क्षेत्रात सुरक्षितता, अचूकता आणि सेवा यांचे नवीन मानक प्रस्थापित करण्यासाठी एस.एल. रहेजा हॉस्पिटल आता पूर्णपणे सज्ज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande