
बंगळुरू, 29 एप्रिल (हिं.स.) : कामगिरी-आधारित ट्रेडर्ससाठी तयार करण्यात आलेल्या ब्रोकिंग प्लॅटफॉर्म साही ने आज आपल्या बी-सिरीज फंडिंग राउंडमध्ये 33 दशलक्ष अमेरिकन डॉलर उभारल्याची घोषणा केली. या फेरीचे नेतृत्व अग्रगण्य व्हेंचर कॅपिटल फर्म Accel ने केले असून एलीव्हेशन कॅपिटलनेही यात सहभाग नोंदवला आहे. एस्सेलच्या समर्पित ग्रोथ फंडमधून मिळालेली ही गुंतवणूक कंपनीच्या ए-सिरीजनंतर एका वर्षाच्या आत झाली आहे.
कंपनीच्या जलद उत्पादन नवकल्पना, वाढता ग्राहक स्वीकार आणि प्लॅटफॉर्मवरील उच्च ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीमुळे ही वाढ शक्य झाली असल्याचे सांगण्यात आले.
ऑगस्ट 2023 मध्ये डेल वाझ आणि मनीष जैन यांनी स्थापन केलेली साही ही NSE आणि BSE नोंदणीकृत ब्रोकिंग संस्था असून “गंभीर रिटेल ट्रेडर्सना व्यावसायिक दर्जाची साधने मिळायला हवीत” या तत्त्वावर आधारित आहे.
कंपनीचा चार्ट-केंद्रित इंटरफेस ट्रेडर्सना विश्लेषण, निर्णय आणि ऑर्डर अंमलबजावणी एकाच ठिकाणी करण्याची सुविधा देतो. यामुळे अनुभवी ट्रेडर्सचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे कंपनीने नमूद केले.
साहीने पूर्ण ट्रेडिंग स्टॅक स्वतः विकसित केला असून त्यात प्रॉप्रायटरी चार्टिंग, ऑर्डर एक्झिक्युशन आणि ऑटोमेटेड रिस्क मॅनेजमेंट टूल्सचा समावेश आहे.
उल्लेखनीय कामगिरी
ट्रेड व्हॉल्यूममध्ये 24 पट वाढ (एप्रिल 2025 ते मार्च 2026)
सक्रिय ट्रेडर्समध्ये 19 पट वाढ
13 कोटींपेक्षा जास्त ट्रेड्स अंमलात
सुमारे 4 लाख डिमॅट खाती ऑनबोर्ड
यापैकी 86% पेक्षा जास्त ट्रेड्स FY26 मध्ये झाले
संस्थापकांचे मत
सह-संस्थापक व सईओ डेल वाझ म्हणाले की, भारतात मोठ्या प्रमाणात सक्रिय गुंतवणूकदार असूनही अनेकांना योग्य निर्णय घेण्यासाठी गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. “साधा, वेगवान आणि स्पष्ट ट्रेडिंग अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
सीपीओ मनीष जैन यांनी सांगितले की, प्रत्येक ट्रेडरच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि त्यानुसार डिझाइन केलेली साधने साहीमध्ये विकसित करण्यात आली आहेत.
गुंतवणूकदारांचा विश्वास एस्सेलच्या मानसी शाह यांनी सांगितले की, भारतातील रिटेल ट्रेडिंगचा वाढता कल हा संरचनात्मक बदल असून साहीसारख्या प्लॅटफॉर्मनी या बदलाला योग्य दिशा देण्याची क्षमता आहे.
एलीव्हेशन कॅपिटलचे वास भास्कर यांनीही साहीच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे कौतुक करत कंपनीच्या जलद वाढीबाबत विश्वास व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी