एकापाठोपाठ एक पद्धतीने (साल्वो) लक्ष्यवेध करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी
भुवनेश्वर, 30 एप्रिल (हिं.स.) - संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने, त्यांच्या लघु पल्ल्याच्या नौदल- जहाज-रोधी क्षेपणास्त्राच्या मालिकेतील एकापाठोपाठ एक पद्धतीने (साल्वो) लक्ष्यवेध करणाऱ्या क्षेपणास्त्राची, बंगालच्या उपसा
चाचणी


भुवनेश्वर, 30 एप्रिल (हिं.स.) -

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने, त्यांच्या लघु पल्ल्याच्या नौदल- जहाज-रोधी क्षेपणास्त्राच्या मालिकेतील एकापाठोपाठ एक पद्धतीने (साल्वो) लक्ष्यवेध करणाऱ्या क्षेपणास्त्राची, बंगालच्या उपसागरातील ओडिशाच्या किनाऱ्यावर नौदलाच्या हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्मवरुन यशस्वी चाचणी केली. या चाचणीदरम्यान, एकापाठोपाठ एक अशी दोन क्षेपणास्त्रे एकाच हेलिकॉप्टर वरुन सोडण्यात आली, ही, अत्याधुनिक, जहाज-रोधी क्षेपणास्त्र प्रणालीतील पहिली यशस्वी चाचणी ठरली.

या चाचणीच्या वेळी ठरवण्यात आलेली सगळी उद्दिष्टे संपूर्णपणे पूर्ण झाली असून, चांदीपूरच्या एकात्मिक टेस्ट रेंजवरुन, करण्यात आलेल्या चाचणीच्या वेळी, रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली आणि टेलिमेट्री अशा उपकरणांमधून, त्याचा डेटा जमा करण्यात आला आहे. पहिल्यांदाच केलेल्या या यशस्वी चाचणीतून आपली क्षमता सिद्ध करत, या क्षेपणास्त्रानी पाण्यात अचूक प्रहार करण्याची क्षमताही सिद्ध केली आहे. या चाचणीच्या वेळी, डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय नौदल आणि हवाई दलाचे प्रतिनिधी तसेच विकास-सह-उत्पादन भागीदार उपस्थित होते.

या क्षेपणास्त्रावरील, सर्व उप-प्रणाली, जसे की सीकर, इंटीग्रेटेड एव्हिऑनिक्स मॉड्यूल, उच्च-बँडविड्थ टू-वे डेटा लिंक आणि जेट-व्हेन नियंत्रण यांचा विकास डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योगांनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे केला आहे.

ही क्षेपणास्त्र प्रणाली हैदराबादच्या संशोधन केंद्र इमारत यांनी डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांच्या सहकार्याने विकसित केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणी बद्दल, डीआरडीओ, भारतीय नौदल, हवाई दल आणि उद्योगक्षेत्राचे कौतुक करत या पहिल्या यशस्वी चाचणीसाठी अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्राच्या विकासामुळे, संरक्षण दलांची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल, असे त्यांनी म्हटले आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण आणि संशोधन विभगाचे सचिव डॉ. समीर नाईक यांनी चाचणीसाठी परिश्रम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande