सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांनाच - मुख्यमंत्री
नाशिक, 05 एप्रिल (हिं.स.)। भोंदू अशोक खरात प्रकरणातील सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नसून तो केवळ तपास यंत्रणांनाच आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांच्याकडून हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला आणि तो कोणी लीक केला, याबाबत राज्य सरकार सखो
Fadnavis


नाशिक, 05 एप्रिल (हिं.स.)।

भोंदू अशोक खरात प्रकरणातील सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नसून तो केवळ तपास यंत्रणांनाच आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांच्याकडून हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला आणि तो कोणी लीक केला, याबाबत राज्य सरकार सखोल चौकशी करणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पंचवटीतील तपोवन येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात दोन दिवसीय अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय बैठकीचा समारोप रविवारी (दि. ५) झाला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण तसेच स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणांमध्ये केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चालत नाही. ज्यांच्याविरोधात सबळ पुरावे असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. कोण कोणाशी बोलले किंवा कोणी कोणाशी काय केले, याच्या आधारावर न्यायव्यवस्था चालत नाही. अशोक खरातने केलेल्या चुकीच्या कामात सहभागी असलेल्या प्रत्येकालाच शिक्षा होणार असून, त्यात कोणीही असला तरी तो सुटणार नाही.“सगळी पाळेमुळे खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरातने उघडलेली विविध खाती आणि त्यातील व्यवहार आमच्या निदर्शनास आले आहेत. तसेच लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढल्याने नागरिक स्वतःहून पुढे येऊन माहिती देत आहेत. एसआयटीकडे मोठ्या प्रमाणात माहिती जमा होत आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande