ईस्टरनिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
नवी दिल्ली , 05 एप्रिल (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा देत प्रेम, आशा, बंधुभाव आणि समाजातील एकता अधिक दृढ करण्याचा संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या सं
ईस्टरनिमित्त राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना शुभेच्छा


नवी दिल्ली , 05 एप्रिल (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा देत प्रेम, आशा, बंधुभाव आणि समाजातील एकता अधिक दृढ करण्याचा संदेश दिला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटले, “ईस्टरच्या सर्वांना, विशेषतः आपल्या ख्रिश्चन बांधवांना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा! येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा पवित्र सण प्रेम, आशा आणि जागतिक बंधुभावाची भावना वृद्धिंगत करणारा आहे. येशू ख्रिस्तांच्या शिकवणी आपल्याला शांतता आणि सौहार्दाच्या मार्गावर नेवो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र दिवस आशा आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे. तो प्रत्येकाच्या जीवनात शांतता, आनंद आणि प्रकाश घेऊन येवो.” पुढे त्यांनी म्हटले की, येशू ख्रिस्तांच्या शिकवणीमुळे सर्वांना दयाळू आणि सहकार्यशील बनण्याची प्रेरणा मिळो तसेच समाजात एकतेची भावना अधिक मजबूत होवो.

ईस्टर हा सण येशू ख्रिस्तांच्या मृत्यूनंतर झालेल्या पुनरुत्थानाची आठवण करून देतो आणि संपूर्ण जगाला आशा, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande