अनेक राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीची केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्वतःहून घेतली दखल
नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अनेक राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीची स्वतःहून दखल घेतली. त्यानंतर कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीमुळ
Union Agriculture Minister


नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अनेक राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीची स्वतःहून दखल घेतली. त्यानंतर कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती संकलित करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. चौहान यांनी शेतकरी बंधू आणि भगिनींना आश्वस्त केले की त्यांनी काळजी करू नये, संकट काळात मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे .चौहान गारपीट आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर संबंधित राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande