आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची ११ पदके निश्चित
उलानबातार , 06 एप्रिल (हिं.स.)मंगोलियातील उलानबातार येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची प्रभावी कामगिरी कायम आहे. पाच महिला आणि सहा पुरुष बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. पुरुष गटात लोकेश, आकाश आणि हर्ष
आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची ११ पदके निश्चित


उलानबातार , 06 एप्रिल (हिं.स.)मंगोलियातील उलानबातार येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची प्रभावी कामगिरी कायम आहे. पाच महिला आणि सहा पुरुष बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

पुरुष गटात लोकेश, आकाश आणि हर्ष चौधरी यांच्या विजयामुळे एकूण सहा भारतीय बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मीनाक्षी (४८ किलो) आणि जस्मिन (५७ किलो) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या लढती जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.मीनाक्षीने जपानच्या युका सदामत्सुला ५-० अशा एकमताने पराभूत केले. जस्मिनने चीनच्या झीयी चेनला ५-० ने हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

यापूर्वी शनिवारी, निखत झरीन, प्रिया घंगहास आणि प्रीती पवार यांनीही उपांत्यपूर्व फेरीतील लढती जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.पुरुषांच्या गटात भारतीय बॉक्सर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.८५ किलो वजनी गटात, लोकेशने कोरियाच्या गिचे किमचा ५-० ने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. आकाशने तुर्कमेनिस्तानच्या याल्हस बागतायरोव्हचा ५-० ने पराभव केला. हर्ष चौधरीनेही किर्गिझ प्रजासत्ताकच्या टिनिस्तान अलिबायेव्हचा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

पण ८० किलो वजनी गटात अंकुश जॉर्डनच्या हुसेन इशाशकडून पराभूत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. ५० किलो गटात विश्वनाथ सुरेशने आणि ६० किलो गटात सचिननेही विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande