सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय, फ्रँचायझींना दरवर्षी २४०० कोटी रुपयांचे नुकसान- ललित मोदी
मुंबई, 07 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलच्या माजी आयुक्त ललित मोदी यांनी सांगितले की, सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना प्रत्येक हंगामात सुमारे 2,400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांच्या मते, कमी सामने हे याचे सर्वात मोठे कारण आहे. त
सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय, फ्रँचायझींना दरवर्षी २४०० कोटी रुपयांचे नुकसान- ललित मोदी


मुंबई, 07 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलच्या माजी आयुक्त ललित मोदी यांनी सांगितले की, सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना प्रत्येक हंगामात सुमारे 2,400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांच्या मते, कमी सामने हे याचे सर्वात मोठे कारण आहे. ते म्हणाले, आम्ही जे विकले होते, ते हे नाही.

ललित मोदींनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध दोनदा खेळण्याची योजना होती. 2022 मध्ये 10 संघ असताना 90 लीग सामने आणि चार नॉकआउट सामने झाले असते. मात्र, आयपीएलने होम-अँड-अवे प्रणाली बदलून केवळ 74 सामने ठेवले. यामुळे फ्रँचायझींना नुकसान होत आहे. आम्ही जे विकले होते, ते हे नाही. ते म्हणाले, प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 50% आणि उर्वरित 50% संघांमध्ये वाटले जाते. यामुळे संघांना 20 सामन्यांचे नुकसान होत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, आयपीएलची खरी किंमत होम-अँड-अवे फॉरमॅटमध्ये आहे. जर कॅलेंडरमध्ये सामन्यांसाठी जागा नव्हती, तर संघांची संख्या वाढवायला नको होती. ते म्हणाले, आम्ही आयपीएल अशा प्रकारे विकले नव्हते. त्यांनी प्रश्न विचारला की सर्व संघांनी या बदलाला सहमती दिली होती का आणि म्हणाले की असे झाले नसेल.94 सामने असते तर कमाई वाढली असती ते म्हणाले, जर होम-अँड-अवे फॉरमॅटमध्ये 94 सामने झाले असते आणि प्रत्येक सामन्याची किंमत 118 कोटी रुपये असती, तर मीडिया हक्कांमधून 2,400 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली असती. म्हणजेच, बीसीसीआयला 2,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला असता. यापैकी 1,200 कोटी रुपये 10 संघांना मिळाले असते, प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये, आणि संघांचे मूल्य वाढले असते.

दरम्यान, आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात निलंबित झाले ललित मोदींना 2010 मध्ये आयपीएलच्या तिसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर लगेचच बीसीसीआय ने निलंबित केले. त्याच वर्षी अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्याचे कारण देत ते भारत सोडून लंडनला गेले. नंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) त्यांच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आणि त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला.तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत आहेत. त्यांच्याविरुद्ध आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावात हेराफेरी, मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या उल्लंघनाची प्रकरणे सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande