तनिष्कने ‘ह्यूज’ कलेक्शनसह उभारले जेमस्टोन्सचे नवे आयाम
नागपूर, 06 एप्रिल (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य ज्वेलरी ब्रँड तनिष्कने अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपले नवीन ‘ह्यूज’ कलेक्शन सादर केले आहे. हे कलेक्शन विशेषतः आधुनिक भारतीय स्त्रीसाठी तयार केले आहे, जे नैसर्गिक रंगीत जेमस्टोन्सच्या माध्यमातून व्
तनिष्क ह्यूज’ कलेक्शन  लोगो


नागपूर, 06 एप्रिल (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य ज्वेलरी ब्रँड तनिष्कने अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपले नवीन ‘ह्यूज’ कलेक्शन सादर केले आहे. हे कलेक्शन विशेषतः आधुनिक भारतीय स्त्रीसाठी तयार केले आहे, जे नैसर्गिक रंगीत जेमस्टोन्सच्या माध्यमातून व्यक्तिमत्व आणि शैलीला अधोरेखित करते.

‘ह्यूज’मध्ये पाचू, ॲमेथिस्ट, सिट्रीन, टूमलाईन आणि टांझॅनाइट यांसारख्या 100 टक्के नैसर्गिक जेमस्टोन्सचा समावेश आहे. प्रत्येक जेमस्टोन काळजीपूर्वक निवडला गेला असून, त्याची चमक, शुद्धता आणि रंग यांचे परीक्षण करण्यात आले आहे. कलेक्शनमध्ये मार्कीझ, ताबीझ आणि कॅबोचॉन कटसह जेमस्टोन्सच्या विविध आकारांचा समावेश असून, त्यातून प्रत्येक दागिन्याला एक अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त होते.तनिष्कच्या हेड ऑफ डिझाइन गरिमा माहेश्वरी म्हणाल्या, “या कलेक्शनमधील जेमस्टोन्स फक्त सजावटीपुरते नाहीत; ते संपूर्ण डिझाइनची सुरुवात आहेत. रंग, प्रमाण आणि संतुलन यांचे बारकाईने काम करून प्रत्येक दागिन्याला आधुनिक आणि प्रभावी रूप दिले आहे.

कॅम्पेनमध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी ‘ह्यूज’ची ओळख साकारत आहेत. त्यांनी सांगितले, “या कलेक्शनमधील रंग विविध मूड आणि शैली व्यक्त करण्याचे साधन आहेत. हे दागिने फक्त खास प्रसंगासाठी नाहीत, तर तुमच्या रोजच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहेत. तनिष्कच्या टायटन कंपनी लिमिटेडच्या सीएमओ पेल्की त्शेरिंग म्हणाल्या की, आधुनिक भारतीय महिलांसाठी दागिने फक्त सजावटीपुरते राहिलेले नाहीत; ती स्वतःला व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहेत. ह्यूज कलेक्शनच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांचे आवडते क्षितिजे रुंदावण्याची संधी देत आहोत.

कलेक्शनची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरू होते.

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विशेष ‘फेस्टिव्ह ऑफर्स’ अंतर्गत मेकिंग चार्जेस आणि डायमंड व्हॅल्यूवर 20 टक्क्यांपर्यंत सूट, तसेच सोन्याच्या खरेदीवर प्रति ग्रॅम 201 रुपयांची सूट दिली जात आहे. ग्राहक जुने सोने बदलून नवीन, स्टायलिश दागिने घेऊ शकतात.

‘ह्यूज’ कलेक्शन आधुनिक भारतीय स्त्रीसाठी एक नवीन ओळख निर्माण करते – जी पारंपरिकतेशी जोडलेली, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि रंगीबेरंगी शैलीला प्राधान्य देते.-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande