वनप्लसने मिड-रेंज स्मार्टफोन नॉर्ड 6 भारतात केला लॉन्च
मुंबई, 08 एप्रिल (हिं.स.)। वनप्लस नॉर्ड 6 हा नवीन मिड-रेंज स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला असून यामध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत. नॉर्ड सिरीजमधील हा फोन आता थेट फ्लॅगशिप डिव्हाइसेसना टक्कर देणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे. आकर्षक
OnePlus Launches Mid-Range Smartphone Nord 6 India


मुंबई, 08 एप्रिल (हिं.स.)। वनप्लस नॉर्ड 6 हा नवीन मिड-रेंज स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला असून यामध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत. नॉर्ड सिरीजमधील हा फोन आता थेट फ्लॅगशिप डिव्हाइसेसना टक्कर देणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे. आकर्षक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ३८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला दुसरा व्हेरिएंट ४१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनची विक्री ९ एप्रिलपासून अमेझॉन आणि वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे. काही निवडक बँक ऑफर्सअंतर्गत ग्राहकांना ३,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा १६५ हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १.५ के रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीनची ब्राइटनेस आणि स्मूदनेस उत्कृष्ट असल्यामुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला मिळतो. तसेच ‘अक्वा टच २.०’ फीचरमुळे ओल्या हातांनीही स्क्रीन सहजपणे वापरता येते, ही याची खास वैशिष्ट्य आहे.

परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन अत्यंत शक्तिशाली मानला जात आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८एस जेन ४ प्रोसेसर देण्यात आला असून हा चिपसेट हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी सक्षम आहे. फोनमध्ये अॅडव्हान्स कूलिंग सिस्टीम देण्यात आल्यामुळे दीर्घकाळ वापरातही परफॉर्मन्स स्थिर राहतो, असा कंपनीचा दावा आहे.

बॅटरी हा या फोनचा सर्वात मोठा आकर्षण ठरत आहे. या स्मार्टफोनमध्ये ९००० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती सामान्य वापरात दोन दिवसांपेक्षा जास्त टिकू शकते. यासोबत ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो, ज्यामुळे सुमारे ७० मिनिटांत फोन पूर्ण चार्ज होतो. याशिवाय २७ वॉट रिव्हर्स चार्जिंग फीचरमुळे इतर डिव्हाइसेस चार्ज करण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

कॅमेरा सेटअपही संतुलित ठेवण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून तो ओआयएस आणि ईआयएस सपोर्टसह येतो. याशिवाय ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगलाही सपोर्ट करतो, त्यामुळे कंटेंट क्रिएटर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

या फोनला आयपी ६६, आयपी ६८ आणि आयपी ६९ रेटिंग देण्यात आली असून त्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. तसेच एमआयएल-एसटीडी-८१०एच सर्टिफिकेशनमुळे त्याची मजबुती वाढते. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित ऑक्सिजनओएस १६ वर चालतो. कंपनीने चार वर्षांचे ओएस अपडेट आणि सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय वाय-फाय ७, ब्लूटूथ ६, एनएफसी आणि ५जी सपोर्टसारखे आधुनिक फीचर्सही यात समाविष्ट आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande