बँकेच्या मॅनेजरचे घर फोडले, मौल्यवान वस्तू चोरीला
जळगाव , 08 एप्रिल (हिं.स.) रावेर शहरात अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत पीपल्स बँकेच्या मॅनेजरच्या घरावर डल्ला मारल्याची घटना समोर आलीय. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पीपल्स बँकेचे मॅनेजर प्रकाश पाटील यांच्या राहत्य
बँकेच्या मॅनेजरचे घर फोडले, मौल्यवान वस्तू चोरीला


जळगाव , 08 एप्रिल (हिं.स.) रावेर शहरात अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत पीपल्स बँकेच्या मॅनेजरच्या घरावर डल्ला मारल्याची घटना समोर आलीय. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पीपल्स बँकेचे मॅनेजर प्रकाश पाटील यांच्या राहत्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले असताना घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. घरातील नेमकी किती रोकड, सोनं-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पीपल्स बँकेचे चेअरमन दिलीप पाटील यांच्या घरातही चोरीची घटना घडली होती. त्यामुळे एकाच बँकेशी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या घरांवर चोरी झाल्याने शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बेमालूम वावर आणि नियोजनबद्ध हालचाली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande