छ. संभाजीनगरमध्ये वैद्यकीय अधीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। बिडकीन शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी १ हजार २०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कंत्राटी सफाई कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभ
छ. संभाजीनगरमध्ये वैद्यकीय अधीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। बिडकीन शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी १ हजार २०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कंत्राटी सफाई कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या बहिणीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात करायची होती. ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत होणे अपेक्षित असताना येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शासकीय सेवा मोफत असताना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या विभागाने तक्रारीची पडताळणी केली.

याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, तपास अधिकारी संतोष तिगोटे, हवालदार इंगळे आणि युवराज हिवाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande