रसायनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; लग्नाचे आमिष देत २७ आठवड्यांची गर्भवती
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत मोहपाडा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आ
Minor-girl-raped-in-Khasiyana


रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)।

रसायनी पोलीस ठाणे हद्दीत मोहपाडा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ यास संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने तिच्याशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर मोहपाडा येथील एका खोलीत तसेच मोरबे धरणाजवळील जंगल भागात बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर आरोपीने खालापूर येथील आपल्या राहत्या घरीही वेळोवेळी अत्याचार करून पीडित मुलीला तब्बल २७ आठवड्यांची गर्भवती केल्याचे समोर आले आहे. ही बाब पीडित मुलीच्या आईसह इतर आरोपींना समजूनही त्यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही दुर्लक्ष केले.

रोजी सारसई ता.पनवेल येथील कालिका माता मंदीरात बालविवाह लावुन दिले.

याबाबत रसायनी पोलीस ठाणे गुरनं.55/2026, बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 चे

कलम 9, 11, बी.एन.एस.2023 चे कलम सह बालकांचे लैगिक अपराधापसून संरक्षण 2012 चे कलम

64(2)(1) 64(2) ( M)65(1), 4,6,8, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास

सपोनि/जाधव हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande