
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी २८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ४७७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईतून पोलिसांनी एकूण ५ लाख ७५० रुपये इतका दंड वसूल केला आहे. वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळावेत आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)