खालापूरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून लैंगिक अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा
रायगड, 08 एप्रिल, (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत परखंदे आदिवासी वाडी (पो. वावोशी) येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांक
Scrap theft in Khalapur; Goods worth 10.72 lakhs stolen


रायगड, 08 एप्रिल, (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत परखंदे आदिवासी वाडी (पो. वावोशी) येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जानेवारी २०२४ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपी क्रमांक १ ते ४ यांना पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपी क्रमांक २ ते ४ यांनी रितीरिवाजाप्रमाणे तिचे लग्न आरोपी क्रमांक १ याच्यासोबत लावून दिले. लग्नानंतर पीडित मुलगी सासरी राहत असताना आरोपी क्रमांक १ याने तिच्या अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती झाली असून आरोपीच्या कृत्यामुळे तिच्या प्रसूतीस कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून बालविवाह आणि अल्पवयीनांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत खालापूर पोलीस ठाणे गुरनं.129/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम

64(2)(आय), 64(2),(एम) सह बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे

कलम4, 5(जे)(2), 5(एल), 6, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 11 प्रमाणे गुन्हा

दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/मोरे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande