पाण्याच्या वादातून दीराकडून वहिनीवर हल्ला; कर्जतमध्ये गुन्हा दाखल
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मालेवाडी येथे पाण्याच्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहिती
**पाण्याच्या वादातून दीराकडून वहिनीवर हल्ला; कर्जतमध्ये गुन्हा दाखल**  कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मालेवाडी येथे पाण्याच्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी आपल्या पतीसह राहत्या घरी असताना त्यांच्या दीराने बोअरिंगच्या पाण्यावरून सुरू असलेला वाद मनात धरून तसेच त्याच्या जागेत ये-जा करू नये या कारणावरून संताप व्यक्त केला. यावेळी आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.  वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने घरातील लोखंडी रॉड हातात घेऊन फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळील दोन बोटांवर जोरदार मार लागल्याने त्या जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र दुसाणे करीत आहेत.


रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मालेवाडी येथे पाण्याच्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी आपल्या पतीसह राहत्या घरी असताना त्यांच्या दीराने बोअरिंगच्या पाण्यावरून सुरू असलेला वाद मनात धरून तसेच त्याच्या जागेत ये-जा करू नये या कारणावरून संताप व्यक्त केला. यावेळी आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने घरातील लोखंडी रॉड हातात घेऊन फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळील दोन बोटांवर जोरदार मार लागल्याने त्या जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र दुसाणे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande