'तुला जात दाखवतो' म्हणत धमकी; चौक बाजारात मारहाण, गुन्हा दाखल
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)।खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौक बाजारपेठेत एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या लहान मुलासह
Threatening to show caste; Assault case in Chowk Bazaar


रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)।खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौक बाजारपेठेत एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या लहान मुलासह मोटारसायकल (क्र. एमएच ४६ ए क्यू ९३४१) घेऊन सामान खरेदीसाठी चौक बाजारपेठेत गेले होते. त्यांनी बाजारपेठेतील बिकानेर स्वीटमार्टजवळील मोकळ्या जागेत गाडी उभी केली. यावरून मच्छी विक्री करणाऱ्या आरोपीस राग आला आणि त्याने फिर्यादीला “तुम्ही आदिवासी सुधारणार नाही” अशा जातीवाचक शब्दांत अपमानित केले.

फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत “पुन्हा गाडी लाव, तुला जात दाखवतो” अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने भर बाजारातच हाताबुक्यांनी मारहाण केली. भीतीपोटी फिर्यादी जवळच्या दुकानात गेले असता आरोपीने त्यांचा पाठलाग करून दुकानात शिरून पुन्हा मारहाण केली.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande