
नवी दिल्ली, 08 एप्रिल (हिं.स.) : आसाममधील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने बनावट पत्र जारी करण्यात आले आहे. हे पत्र कथितरित्या संघ प्रमुखांनी पंतप्रधानांना लिहिल्याचा बनाव करण्यात आला आहे. आसाममध्येच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संघ आणि भाजपाविरोधात केलेल्या अभद्र वक्तव्यानंतर या बनावट पत्राचा संबंध काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी जोडला जात असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाचे माजी पदाधिकारी आणि सुरूचि प्रकाशनचे अध्यक्ष राजीव तुली यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले की, अशा प्रकारच्या कृत्यांमुळे संघाचे स्वयंसेवक किंवा संघाबद्दल जाण असलेले लोक प्रभावित होत नाहीत. मात्र, निवडणुकीच्या राजकारणासाठी संघावर विनाकारण हल्ले केल्याने काँग्रेसची प्रतिमा अधिकच खालावत असल्याचे तुली म्हणाले. संघाच्या लेटरहेडवर आणि संघ प्रमुखांच्या बनावट स्वाक्षरीने पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्राची भाषा अत्यंत खालच्या दर्जाची असल्याने कोणत्याही सामान्य समज असलेल्या व्यक्तीलाही ते खोटे असल्याचे सहज ओळखता येईल असे त्यांनी सांगितले. या पत्रात आसाम भाजपातील घडामोडी आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर असल्याचे सांगत पंतप्रधानांना सूचनात्मक आणि इशारावजगा भाषेत लिहिण्याचा प्रयत्न सदर पत्रातगून करण्यात आला आहे.
राजीव तुली यांनी या बनावटी पत्राला हास्यास्पद आणि निर्लज्ज प्रयत्न म्हंटले आहे. त्यांनी सांगितले की, हे काम काँग्रेसच्या दुष्प्रचार यंत्रणेने केले असो किंवा इतर कोणत्याही राजकीय गटाने, त्यांना संघाच्या कार्यपद्धतीची अजिबात समज नाही. संघ कोणत्याही संबंधित संस्थेला पत्राद्वारे किंवा सार्वजनिकरीत्या निर्देश देत नाही, तर परस्पर चर्चेद्वारे निर्णय घेतो.तसेच, तुली यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या संघावरील वक्तव्याला देशविरोधी म्हंटले आहे. मतांसाठी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून समाजात फूट पाडण्याची काँग्रेसची जुनी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आता जनता अधिक जागरूक झाली असून अशा प्रकारच्या राजकारणाला प्रतिसाद देत नाही, असेही तुली नमूद केले.
संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, भारतीय हिंदू आणि मुस्लीम यांचे मूळ एकच आहे आणि दोन्ही समाजांमध्ये संवाद व समन्वय आवश्यक आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी