मोदी सरकारच्या तारणमुक्त कर्ज उपलब्धतेने लहान व्यापारी आणि नवोपक्रमांना सक्षमता - केंद्रीय गृहमंत्री
नवी दिल्ली, 08 एप्रिल (हिं.स.)। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तारण-मुक्त कर्ज उपलब्ध करून देऊन लहान व्यापारी आणि नवोपक्रमांना सक्षम केले आहे. त्यामुळे स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांना नवी चालना मिळाली, असे प्रतिपादन, प्रधानमंत्री मुद्रा
Amit Shah


नवी दिल्ली, 08 एप्रिल (हिं.स.)। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तारण-मुक्त कर्ज उपलब्ध करून देऊन लहान व्यापारी आणि नवोपक्रमांना सक्षम केले आहे. त्यामुळे स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांना नवी चालना मिळाली, असे प्रतिपादन, प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित यांनी केले आहे.

“मुद्रा योजनेच्या 11 वर्षांत,नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तारण-मुक्त कर्ज देऊन लहान व्यापारी आणि नवोपक्रमांना सक्षम केले आहे, ज्यामुळे स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांना नवीन बळ मिळाले आहे,असे,‘एक्स ’ या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले आहेत.

”गेल्या 11 वर्षांत, या कल्याणकारी योजनेअंतर्गत 40 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीची एकूण 58 कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली असून, 12 कोटी तरुणांना याचा लाभ झाला आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीच्या प्रवासाला नवी गती मिळाली आहे.वितरित केलेल्या प्रत्येकी 3 मुद्रा कर्जांपैकी 2 कर्जे महिलांना देण्यात आली आहेत, हे महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने केलेली एक ऐतिहासिक कामगिरी आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande