
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। 'सोशल मीडियावरील बर्थडे स्टेटसच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला तिच्या घरात घुसून मारहाण करत कटरने जखमी केले. ही घटना वडगाव कोल्हाटी परिसरात घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
आरोपी महिला ही फिर्यादीच्या वडगाव कोल्हाटी येथील घरी आली. तुझ्या नवऱ्याने माझे बर्थडे स्टेटस का ठेवले? या कारणावरून तिने वाद घालत शिवीगाळ केली. नंतर कटरसारख्या धारदार शस्त्राने फिर्यादी महिलेला उजव्या हातावर वार करून जखमी केले. जीवे मारण्याची धमकीही दिली. फिर्यादीला शिवीगाळ केली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis