इबोला विषाणूचा संसर्ग : कांगो, युगांडात आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित
नवी दिल्ली, १७ मे (हिं.स.) : कांगो आणि युगांडा देशामध्ये पसरत असलेल्या इबोला विषाणूच्या संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केले आहे. यामुळे जगाची चिंता वाढवणाऱ्या एका भयानक विषाणूच्या फैलावाला पुन्हा एकदा सु
Ebola virus Health Emergency


नवी दिल्ली, १७ मे (हिं.स.) : कांगो आणि युगांडा देशामध्ये पसरत असलेल्या इबोला विषाणूच्या संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केले आहे. यामुळे जगाची चिंता वाढवणाऱ्या एका भयानक विषाणूच्या फैलावाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत कांगोच्या इटुरी प्रांतामधील बुनिया, रवामपारा आणि मोंगब्वालू भागात ८० संशयित मृत्यू झाला असून ८ रुग्ण आणि २४६ संशयित रुग्ण सापडले आहेत. इबोला हा एका अत्यंत धोकादायक विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. याचा संसर्ग होण्याचं प्रमाण फार दुर्मिळ आहे. मात्र अनेकदा हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, उलटी, घाम किंवा विर्य अशा द्रवरूप पदार्थाच्या संपर्कात आल्याने एकापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. इबोला विषाणूवर अद्याप कुठलाही इलाज सापडलेला नाही. मात्र त्यावरील लस उपलब्ध असल्याची माहिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande