इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच; दोन मार्चपासून आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
बेरूत (लेबनान), 19 मे (हिं.स.)। अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी युद्धविरामाचा (सीज फायर) अद्याप कोणताही विशेष परिणाम दिसून आलेला नाही. लेबनानमध्ये सक्रिय असलेल्या इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाह आणि इ
Israel attack Lebanon continues over 3,000 people have died


बेरूत (लेबनान), 19 मे (हिं.स.)। अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी युद्धविरामाचा (सीज फायर) अद्याप कोणताही विशेष परिणाम दिसून आलेला नाही. लेबनानमध्ये सक्रिय असलेल्या इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. सोमवारी दक्षिण लेबनानमध्ये झालेल्या हल्ल्यात किमान सात जणांचा मृत्यू झाला. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, दोन मार्चपासून आतापर्यंत लेबनानमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 3,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अल जजीराच्या वृत्तानुसार, मंत्रालयाने म्हटले आहे की, “दोन मार्च ते 18 मे दरम्यान झालेल्या या आक्रमणात मृतांची संख्या 3,020 वर पोहोचली आहे. या हल्ल्यांमध्ये 9,273 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे 211 जण तसेच 116 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.” हिजबुल्लाहने म्हटले आहे की, दक्षिणेकडील गावांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी रशाफ येथे इस्रायली सैनिकांवर ड्रोनद्वारे हल्ला केला.

पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, इस्रायल आणि लेबनानमध्ये केवळ नावालाच सीज फायर लागू आहे. 16 एप्रिल रोजी प्रथमच दोन्ही देशांमध्ये 10 दिवसांच्या सीज फायरवर सहमती झाली होती, मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. हल्ले थांबले नाहीत. 10 दिवसांनंतर सीज फायरचा कालावधी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला, तरीही हल्ले सुरूच राहिले. 15 मे रोजी पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये 45 दिवसांच्या सीज फायरवर सहमती झाली, तरीदेखील हल्ले सुरूच आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande