होर्मुझमध्ये आमच्या जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य, भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर मांडली बाजू
न्यूयॉर्क, 17 मे (हिं.स.)संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, पी. हरीश यांनी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि खतांच्या संकटावर भारताचा दृष्टिकोन मांडला. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षा आणि नौकानयनाच्या
पी. हरीश


न्यूयॉर्क, 17 मे (हिं.स.)संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, पी. हरीश यांनी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि खतांच्या संकटावर भारताचा दृष्टिकोन मांडला. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्यात होणाऱ्या व्यत्ययाबद्दल चिंता व्यक्त केली. हरीश यांनी व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि नागरी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले. भारताने यावरही जोर दिला की सुरक्षित सागरी मार्गांसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे पूर्णपणे पालन केले पाहिजे.

पी. हरीश यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या विशेष बैठकीत भाग घेतला. ऊर्जा आणि पुरवठा प्रवाहांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या बैठकीचा उद्देश होता. त्यांनी सांगितले की या संकटाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अल्पकालीन आणि संरचनात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील महत्त्वाची भूमिका बजावेल. हरीश यांनी लिहिले की आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्णपणे आदर केला पाहिजे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी एका व्यावसायिक यंत्रणेची घोषणा केली आहे. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी सांगितले की, ही यंत्रणा लवकरच सादर केली जाईल. आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, इराणच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाखाली ती विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा फायदा केवळ इराणसोबत सहकार्य करणाऱ्या व्यापारी जहाजांनाच होईल. 'फ्रीडम प्रोजेक्ट'शी संबंधित ऑपरेटर्ससाठी हा मार्ग बंद राहील.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, पश्चिम आशियातील संकट संपवण्यासाठी शांतता करार न झाल्यास अंधारमय काळ येईल. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, पश्चिम आशियातील शांततेच्या मार्गातील अमेरिका हा मुख्य अडथळा आहे. अराघची यांनी दावा केला की, ४० दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेने चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. ते म्हणाले की, या हालचालीबद्दल तेहरानमध्ये तीव्र संशय आहे. अराघची यांनी अमेरिकेवर अविश्वास व्यक्त केला आणि त्यांना कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांमधील मुख्य अडथळा म्हटले.

खरं तर, काही दिवसांपूर्वी ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. हे जहाज सोमालियाहून निघाले होते. ओमानच्या अधिकाऱ्यांनी जहाजावरील सर्व १४ कर्मचाऱ्यांची सुटका केली, परंतु हल्लेखोराची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande