महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; प्रतीका रावलचा समावेश नाही
मुंबई, 02 मे, (हिं.स.) - बीसीसीआयने १२ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली. या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयच्या मुख्यालयात एक बैठक झाली होती. १५ सदस्यीय भारतीय संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरच
भारतीय महिला क्रिकेट संघ


मुंबई, 02 मे, (हिं.स.) - बीसीसीआयने १२ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली. या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयच्या मुख्यालयात एक बैठक झाली होती. १५ सदस्यीय भारतीय संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची नियुक्ती करण्यात आली आहे, तर स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

नंदिनी शर्माच्या नावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या २४ वर्षीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण न केलेल्या गोलंदाजाचा विश्वचषक संघात थेट समावेश करण्यात आला. नंदिनीने महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना १० सामन्यांत १७ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली होती.

अमनजोत कौरचा टी-२० विश्वचषक संघात समावेश करण्यात आलेला नाही. तिच्या अनुपस्थितीबद्दल हरमनप्रीत म्हणाली की, ती एक महत्त्वाची क्रिकेटपटू आहे, पण सध्या उपलब्ध नाही. ती गेल्या चार ते पाच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. अष्टपैलू क्रिकटपटू असलेल्या राधाला संघात परत घेण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, १५ सदस्यीय संघात प्रतिका रावलचीही निवड झाली नाही, तर यास्तिका भाटियाने संघात स्थान मिळवले आहे.

भारताचा महिला टी-२० मधील पहिला सामना १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. महिला टी-२० विश्वचषक आतापर्यंत नऊ वेळा खेळला गेला आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने सहा वेळा विश्वचषक जिंकला आहे. दरम्यान, भारतीय महिला संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे.

गेल्या वर्षी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला असला तरी, टी-२० फॉरमॅटमधील संघाची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची नुकतीच झालेली पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका या मोठ्या स्पर्धेसाठी सराव सामना मानली जात होती, परंतु ४-१ च्या पराभवामुळे संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिला T20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande