रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी, 24 मे (हिं.स.) । जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स व कल्चरल फौंडेशन पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटने मार्फत करण्यात आले होते. सात, नऊ, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस वर्षाखालील रत्नागिरी संघाची
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड


रत्नागिरी, 24 मे (हिं.स.) । जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स व कल्चरल फौंडेशन पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटने मार्फत करण्यात आले होते. सात, नऊ, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस वर्षाखालील रत्नागिरी संघाची निवड या स्पर्धांतून पुणे, संभाजीनगर, सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी करण्यात आली.

या स्पर्धा रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस ॲकॅडमी येथे भरवण्यात आल्या होत्या. स्पर्धेत निवड झालेले रत्नागिरी जिल्ह्याचे संघ असे :

सात वर्षे वयोगट मुले - मानस भालेकर, आस्तिक कुलकर्णी

सात वर्षे वयोगट मुली - तीर्था चव्हाण

नऊ वर्षे वयोगट मुले - अमेय लाटे, शार्दूल आंब्रे

नऊ वर्षे वयोगट मुली - ईश्वरी सुवरे, मायरीन भोरे

अकरा वर्षे वयोगट मुले - शर्विल शहाणे, विहंग सावंत

अकरा वर्षे वयोगट मुली - मृण्मयी दांडेकर, स्वरा सकपाळ

तेरा वर्षे वयोगट मुले - ओम तेरसे, मानस नागवेकर

तेरा वर्षे वयोगट मुली - दांडेकर मृण्मयी, गिरीजा दांडेकर

सतरा वर्षे वयोगट मुले - आयुष रायकर, अलिक गांगुली

सतरा वर्षे वयोगट मुली - सई प्रभुदेसाई, आर्या पळसुलेदेसाई

एकोणीस वर्षे वयोगट मुले - श्रीहास नारकर, ओम उतेकर, आयुष रायकर, लवेश पावसकर

एकोणीस वर्षे वयोगट मुली - सई प्रभुदेसाई, सानवी दामले, आर्या पळसुलेदेसाई, तनया आंब्रे

या स्पर्धांना पंच म्हणून विवेक सोहनी, चैतन्य भिडे, प्राची मयेकर यांनी काम केले. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी रायसोनी फौंडेशन व सर्व खेळाडू, पालकांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande