आयपीएल २०२६ : अर्जुनसाठी सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट
नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचे त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी खास पद्धतीने अभिनंदन केले. पंजाब किंग्सविरुद्ध अर्जुनने आपल्या संघाला विजय मिळवून दिला नसला तरी, त
अर्जुन तेंडलुकर आणि सचिन तेंडुलकरचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचे त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी खास पद्धतीने अभिनंदन केले. पंजाब किंग्सविरुद्ध अर्जुनने आपल्या संघाला विजय मिळवून दिला नसला तरी, त्याच्या कामगिरीने नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यानंतर, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून आपला मुलगा अर्जुनचे कौतुक केले. त्यांची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, शाब्बास अर्जुन. या संपूर्ण हंगामात तुझ्या वृत्तीचा मला अभिमान आहे. तू तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला, संयम राखला, शांतपणे काम केलेस आणि शेवटच्या सामन्यापर्यंत संधी न मिळूनही सकारात्मक राहिलास. ते पुढे म्हणाले, क्रिकेट केवळ कौशल्याचीच नाही तर संयमाचीही परीक्षा घेते आणि आज तू या दोन्ही गोष्टी उत्कृष्टपणे हाताळल्या. जमिनीवर पाय ठेवून राहा आणि नेहमी खेळावर प्रेम कर. सदैव प्रेम.

आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर, संघाने अर्जुन तेंडुलकरला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पदार्पणाची संधी दिली. अर्जुनने बॅटने पाच चेंडूंमध्ये पाच धावा केल्या, पण त्याने आपल्या गोलंदाजीने अधिक प्रभावित केले. या डावखुरा वेगवान गोलंदाजाने चार षटकांत ३६ धावा देऊन एक बळी घेतला. त्याचा इकॉनॉमी रेट संघातील इतर गोलंदाजांपेक्षा चांगला होता. अर्जुनने आपल्या पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंगची विकेट घेतली असती, पण कर्णधार ऋषभ पंतने एक सोपा झेल सोडला. तथापि, अर्जुनने हार मानली नाही आणि आपल्या तिसऱ्या षटकात एका शानदार यॉर्करवर प्रभसिमरन सिंगला पायचीत केले.

आयपीएल २०२६ अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दीसाठी विशेष मानली जात आहे, कारण तो मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त दुसऱ्या फ्रँचायझीसाठी खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून लखनऊततचच सुपर जायंट्स संघात हस्तांतरित करण्यात आले. नव्या वातावरणातील आपल्या पहिल्याच संधीत त्याने आपल्या प्रतिभेची झलक दाखवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande