नाशिकमध्ये सहाय्यक वाहतूक अधीक्षकाने केला महिलेचा विनयभंग
नाशिक, 27 मे (हिं.स.)। महिलेचा पाठलाग करून तिचा हात पकडून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग करणाऱ्या सहाय्यक वाहतूक अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही दि.
नाशिकमध्ये सहाय्यक वाहतूक अधीक्षकाने केला महिलेचा विनयभंग


नाशिक, 27 मे (हिं.स.)। महिलेचा पाठलाग करून तिचा हात पकडून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग करणाऱ्या सहाय्यक वाहतूक अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही दि. ६ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बळी मंदिर येथील एका कार्यालयात कर्तव्यावर होती. त्यावेळी आरोपी विजय विश्वनाथ निकम (रा. ओझर) या शिंगाडा तलाव डेपो क्रमांक १ येथे नेमणुकीस असलेल्या सहाय्यक वाहतूक अधीक्षकाने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग केला व तो पीडितेच्या कार्यालयाजवळ आला व म्हणाला, तू गाडीत बस, एक चक्कर मारून ये. मला तुझ्याशी बोलायचे आहे. तेव्हा फिर्यादीने त्याला नकार दिला असता तो गाडीच्या खाली उतरला व फिर्यादीची इच्छा नसताना तिला जबरदस्तीने चॉकलेट देऊ लागला. फिर्यादीने चॉकलेट घेण्यासही स्पष्ट नकार दिला. त्यानंतर निकम याने जबरदस्तीने तिचा उजवा हात पकडला व म्हणाला, की माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस, असे बोलून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande