रत्नागिरी : बँक कर्मचारी आत्महत्याप्रकरणी आणखी दोघांचा पोलिसांकडून कसून शोध
रत्नागिरी, 27 मे (हिं.स.) । अलोरे (ता. चिपळूण) येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली. अटक आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, फरा
रत्नागिरी : बँक कर्मचारी आत्महत्याप्रकरणी आणखी दोघांचा पोलिसांकडून कसून शोध


रत्नागिरी, 27 मे (हिं.स.) । अलोरे (ता. चिपळूण) येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली. अटक आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, फरार असलेल्या आणखी दोघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चारपानी पत्रात अनोखी अखिलेश खेडेकर, अखिलेश खेडेकर, धनंजय शेट्ये, आशीष सावंत, योगेश मोरे आणि वेदांत विजय टाकळे या सहाजणांची नावे नमूद केली होती. संबंधितांकडून दमदाटी, मारहाणीचा प्रयत्न आणि पैशांसाठी दबाव टाकण्यात आल्याने आपण आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.

या प्रकरणी मुकुंद यांचे वडील मुरलीधर पालांडे यांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, आरोपी धनंजय शेट्ये आणि आशीष सावंत हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande