मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आज जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यानंत
Cm


नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आज जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यानंतर कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande